विवाहबाह्य प्रेमसंबंधामुळे महिलेला संपवलं, पुरावा लपविण्यासाठी ब्लँकेटमध्ये गुंडाळलं;

पण ‘Raviraj’ नावानं प्रकरण उलगडलं

राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, पुण्यातील इंदापूरमध्ये काही दिवसांपूर्वी महिलेची हत्या झाली होती. अखेर या हत्येचा आता उलगडा झाला आहे.

इंदापूर तालुक्यातील भिगवण पोलीस स्टेशन हद्दीतील मदनवाडी गावाजवळ ओढ्याच्या पुलाखाली काही दिवसांपूर्वी एका गरोदर महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली होती. अखेर या घटनेचा थरारक उलगडा झाला असून, मृत महिलेचा खून तिच्याच पतीने केला असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.

पोलीस तपासानुसार, दिपाली सुदर्शन जाधव (वय 30, रा. कटफळ, ता. बारामती) हिचा विवाहबाह्य प्रेमसंबंध असल्याचा संशय तिच्या पतीला होता. त्यावरून 12 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी घरगुती वाद वाढत गेला आणि रागात आरोपी पती सुदर्शन ऊर्फ रविराज रणजित जाधव (वय 36) याने पत्नीच्या डोक्यात लोखंडी वस्तूने प्राणघातक हल्ला करून तिचा खून केला. खून केल्यानंतर पुरावा लपविण्यासाठी आरोपीने पत्नीचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून त्याच्या ज्युपिटर दुचाकीवर ठेवला आणि तो मृतदेह भिगवण-बारामती रस्त्यावरील मदनवाडी गावाजवळील ओढ्याच्या पुलाखाली फेकून दिला.

गोंदणामुळे सुगावा..!

22 ऑक्टोबर रोजी स्थानिक पोलीस पाटील नानासाहेब वणवे यांनी पुलाखाली ब्लँकेटमध्ये बांधलेला मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना दिली. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता आणि डोक्याची कवटी फुटलेली होती. मात्र, हातावर ‘Raviraj’ असं गोंदण असल्यानं पोलिसांनी त्यावरून ओळख पटवली. भिगवण पोलीस स्टेशन आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त तपास सुरू केला. तपासादरम्यान सुदर्शन जाधव याने पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार 12 ऑक्टोबर रोजी बारामती पोलीस स्टेशनला दिली होती. परंतु चौकशीत त्याच्या उत्तरात विसंगती आढळल्यानं पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. शेवटी सुदर्शनने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. आरोपी सुदर्शन ऊर्फ रविराज रणजित जाधव याला अटक करून न्यायालयात हजर केले असता, 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत पोलrस कोठडी देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

‘हे आमचे मंदिर आहे’: दिल्लीतील पर्यटकांना महाराष्ट्राच्या लोहगड किल्ल्यावर धुम्रपान करण्यासाठी स्थानिकाने शिकविले

पुणे: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओने संरक्षित वारसा स्थळांवर पर्यटकांच्या वर्तनावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.या क्लिपमध्ये किल्ल्याच्या तटबंदीवर...

कॅश फॉर डिग्री घोटाळ्याप्रकरणी एसपीपीयूने पोलिसात तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले | पुणे...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

होमिओपॅथी प्रॅक्टिशनर्सच्या शासनावर राज्य आज अंतिम निर्णय देऊ शकते | पुणे बातम्या

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सायंकाळी उशिरापर्यंत चालली ज्यात होमिओपॅथी चिकित्सक आणि ॲलोपॅथी डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी युक्तिवाद केला. त्यानंतर दोन्ही...

PMC 75 नागरी शाळांचे आदर्श शाळांमध्ये रूपांतर करण्यासाठी पायाभूत कामे सुरू करणार आहे

नागरी संस्थेच्या कार्यक्षेत्रात सुमारे 180 महापालिका शाळा इमारती आहेत, ज्यात विलीन झालेल्या भागांचा समावेश आहे. पुणे : मॉडेल स्कूल्स (आदर्श शाला) प्रकल्पांतर्गत ओळखल्या...

Translate »
error: Content is protected !!