सा बारामती युवाशक्ती
News अपडेट
वाहनांवर एचएसआरसीपी क्रमांक पट्टी बसवून घेण्याचे आवाहन
३० जून २०२६ अंतिम मुदत
एचएसआरसीपी क्रमांकाची पट्टी न बसविणाऱ्या वाहन मालकांचे वाहन हस्तांतरण, पत्ता बदल करणे, कर्जबोजा चढविणे व उतरविणे आदी कामांवर निर्बंध लावण्यात आते होते. यापुढे अशा वाहन मालकांच्या वाहनांची पुर्ननोंदणी, वाहनात बदल करणे, परवाना नूतनीकरण आदी सर्व कामे (योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण वगळून) थांबविण्यात येणार आहेत, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे.
वाहन मालक,चालकांनी १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना एचएसआरसीपी क्रमांकाची पट्टी बसविण्याबाबत कार्यवाही करावी. ज्या वाहनधारकांनी ३० जून, २०२६ पर्यंत एचएसआरसीपी क्रमांकाची पट्टी बसविण्याकरिता आगाऊ नोंदणी केली आहे. अशा वाहनांना अंमलबजावणीपासून सूट देण्यात येईल. ३० जूननंतर एचएसआरसीपी क्रमांक पट्टी न बसविणाऱ्या वाहनांवर केंद्रीय मोटार वाहन नियम कार्यवाही न केल्यास १९८९ मधील नियम ५० तसेच मोटार वाहन अधिनियमातील कलम १७७ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे.
तरी सर्व वाहनधारक, ऑटोरिक्षा,टॅक्सी,ट्रक,बस संघटना व वाहन वितरक तसेच शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या अखत्यारितील वाहनांवर विहीत मुदतीत पट्टी बसवून घ्यावी. असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केली आहे.
#साबारामतीयुवाशक्ती
#BaramatiNews
#महाराष्ट्रशासन
#सार्वजनिकसूचना
#maharashtra
#sunetrapawar
#NewsUpdate
#पुणे #वाहनधारकसूचना #HSRCP
#RTO
#सार्वजनिकसूचना
#महाराष्ट्रशासन
✍🏻मुख्य संपादक – VINOD MORE























