*अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात बारामती नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा; तब्बल ७ तास ३८ मिनिटे चाललेल्या बैठकीत ६४ विषयांना मंजुरी*

बारामती, दि. २३ : बारामती नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा आज अत्यंत खेळीमेळीच्या व पारदर्शक वातावरणात पार पडली. नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या अध्यक्षतेखाली झालेली ही सभा तब्बल ७ तास ३८ मिनिटे चालली. कालावधीच्या दृष्टीने ही सभा मागील सभांचा विक्रम मोडणारी ठरली. सभेत एकूण ६६ विषयांवर चर्चा झाली असून त्यापैकी ६४ विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. एक विषय तहकूब ठेवण्यात आला, तर एका विषयावर पाच सदस्यीय समिती स्थापन करून तो विषय मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला.

सभेचे पीठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष सचिन सातव यांनी प्रत्येक नगरसेवकाला आपले मत मांडण्याची संधी दिली. सत्ताधारी व विरोधी पक्षातील सदस्यांनीही सकारात्मक भूमिका घेत शहराच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर सूचना मांडल्या. विशेष म्हणजे प्रत्येक नगरसेवकाने केवळ आपल्या प्रभागापुरते मर्यादित न राहता संपूर्ण बारामती शहराच्या हिताच्या विषयांवर मते व सूचना नोंदविल्या.

सभेतील महत्त्वाचे निर्णय
स्वच्छ भारत अभियानांतर्गत सार्वजनिक शौचालयांच्या जागी नवी आधुनिक सार्वजनिक शौचालये उभारण्याचा निर्णय.
रस्ते, ड्रेनेज, स्टॉर्म वॉटर लाईन, अंतर्गत रस्ते आणि विविध विकासकामांना मंजुरी.
शहरातील उद्यानांचे सुशोभीकरण व CSR निधीतून नवीन उद्याने विकसित करण्यास मान्यता.
शहरातील विविध ठिकाणी ड्रेनेज पंपिंग स्टेशन उभारणे व पाणीपुरवठा विभागासाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करण्याचा निर्णय.
सौरऊर्जा प्रकल्प, एलईडी पथदिवे, इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग व्यवस्था व हरित उपक्रमांना प्रोत्साहन.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत AHP प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत निर्णय.
शैक्षणिक, आरोग्य, महिला व बालकल्याण तसेच दिव्यांग कल्याणाच्या विविध योजनांना मंजुरी.
शहरातील घनकचरा व्यवस्थापन, ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया व जैविक खत निर्मिती प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय.
विविध विभागांच्या देखभाल, दुरुस्ती, प्रशासकीय व तांत्रिक कामांसाठी आवश्यक मंजुरी.

समिती स्थापन करून तोडगा काढण्याचा निर्णय
सभेतील एका महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर सर्वानुमते तो विषय समितीकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी पाच पक्षीय समिती स्थापन करण्यात आली असून समितीच्या शिफारशीनंतर संबंधित विषय अंतिम निर्णयासाठी पुन्हा सभेपुढे आणण्यात येणार आहे.

लोकप्रतिनिधींनी मांडल्या विकासाभिमुख सूचना
सभेदरम्यान अनेक नगरसेवकांनी स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, वाहतूक व्यवस्थापन आणि नागरिक सुविधांबाबत सूचना मांडल्या. विविध विषयांवर झालेली सखोल चर्चा आणि सर्व सदस्यांनी दाखविलेली सकारात्मक भूमिका यामुळे सभा सलोख्याच्या वातावरणात पार पडली.

नगराध्यक्षांचा समन्वयाचा आदर्श
सभेचे संचालन करताना नगराध्यक्ष सचिन सातव यांनी प्रत्येक सदस्याला बोलण्याची समान संधी देत संयमाने कामकाज चालविले. त्यामुळे अनेक विषयांवर सखोल चर्चा होऊन व्यापक सहमती निर्माण झाली. त्यामुळे बारामती शहराच्या विकासाला गती देणारे अनेक महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले.
सभेतील वातावरण, सदस्यांचा सक्रिय सहभाग आणि बहुतेक विषयांवर झालेली एकमताची मंजुरी यामुळे बारामती नगरपरिषदेची ही सर्वसाधारण सभा विकासाभिमुख आणि विक्रमी ठरली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

‘हे आमचे मंदिर आहे’: दिल्लीतील पर्यटकांना महाराष्ट्राच्या लोहगड किल्ल्यावर धुम्रपान करण्यासाठी स्थानिकाने शिकविले

पुणे: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओने संरक्षित वारसा स्थळांवर पर्यटकांच्या वर्तनावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.या क्लिपमध्ये किल्ल्याच्या तटबंदीवर...

कॅश फॉर डिग्री घोटाळ्याप्रकरणी एसपीपीयूने पोलिसात तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले | पुणे...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

होमिओपॅथी प्रॅक्टिशनर्सच्या शासनावर राज्य आज अंतिम निर्णय देऊ शकते | पुणे बातम्या

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सायंकाळी उशिरापर्यंत चालली ज्यात होमिओपॅथी चिकित्सक आणि ॲलोपॅथी डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी युक्तिवाद केला. त्यानंतर दोन्ही...

PMC 75 नागरी शाळांचे आदर्श शाळांमध्ये रूपांतर करण्यासाठी पायाभूत कामे सुरू करणार आहे

नागरी संस्थेच्या कार्यक्षेत्रात सुमारे 180 महापालिका शाळा इमारती आहेत, ज्यात विलीन झालेल्या भागांचा समावेश आहे. पुणे : मॉडेल स्कूल्स (आदर्श शाला) प्रकल्पांतर्गत ओळखल्या...

Translate »
error: Content is protected !!