सातारामधील फलटणमधील उपजिल्हा रूग्णालयातील महिला डॉक्टरने आयुष्य संपवलं आहे. डॉक्टरच्या हातावर पेनाने लिहिलेली सुसाईड नोट आढळली आहे. या सुसाईड नोटमध्ये पोलीस निरीक्षक गोपाल बदनेनं वारंवार अत्याचार केल्याचं नमूद करण्यात आलं आहे. सदर घटनेनं साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. त्यांनी संबधित पोलिसांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.
✍🏻मुख्य संपादक – VINOD MORE























