अडीच वर्षांपासून वेतन थकवले, दिवाळीतही ठेवले उपाशी; मंगरूळ आश्रमशाळा परिचर महिलेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

धाराशिव: तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील संत गाडगे बाबा माध्यमिक (पोस्ट- बेसिक) आश्रमशाळेतील प्रयोगशाळा परिचर श्रीमती. राजपुत सुवर्णा दिलीपसिंग यांनी गेल्या अडीच वर्षांपासून थकीत असलेल्या वेतनासाठी शुक्रवार, दि. १७ ऑक्टोबर २०२५ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. ऐन दिवाळीत इतर कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करूनही केवळ आपल्याला वेतनापासून वंचित ठेवत कुटुंबाला उपाशी ठेवण्याचा प्रकार संबंधित अधिकाऱ्यांनी केला असल्याचा गंभीर आरोप त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केला आहे.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात श्रीमती. राजपुत यांनी म्हटले आहे की, “साहेब माझे गेली अडीच वर्षापासुन वेतन थांबले असतांना संबंधितांची दिवाळी आहे म्हणुन वेतन दिले गेले पण मला वेतनापासुन वंचित ठेवले. माझ्या परिवाराला दिवाळीत उपाशी ठेवण्याचे संबंधितांनी ठरविले”. ‘मला जगण्यासाठी वेतन दया अन्यथा लोकशाही मार्गाने केलेल्या उपोषण दरमयान माझा बळी घ्या’, अशा संतप्त भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

त्यांनी २५ सप्टेंबर २०२५ रोजीच जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांना उपोषणाची नोटीस दिली होती. इतर कर्मचाऱ्यांसोबत आपले वेतन देयक सादर न केल्यास आणि इतरांचे वेतन अदा केल्यास, आपण उपोषणास बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. मात्र, जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांनी इतर कर्मचाऱ्यांची बिले मंजूर केली आणि त्यांच्या खात्यावर वेतन जमाही झाले, परंतु श्रीमती. राजपुत यांना पुन्हा डावलण्यात आले.

न्यायालय आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

श्रीमती. राजपुत यांच्या बाजूने शाळा न्यायाधिकरण, सोलापूर यांनी १६ एप्रिल २०२५ रोजी अंतिम आदेश दिलेला आहे. या आदेशाच्या आधारे, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त (लातूर) यांनी ११ सप्टेंबर २०२५ रोजी शाळेला प्रशासक नेमणुकीच्या भेटी दरम्यान, संबंधित समाज कल्याण अधिकारी व मुख्याध्यापक यांना श्रीमती. राजपुत यांच्या हजेरी मस्टरवर सह्या घेऊन तात्काळ वेतन करण्याचे आदेशित केले होते. इतकेच नव्हे तर, प्रादेशिक उपायुक्तांनी ७ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांना तसे लेखी पत्रही दिले होते.

असे असतानाही, संबंधित अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशावर कोणतीही कार्यवाही केली नाही. उलट, जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांनी इतर कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करताना, प्राथमिक विभागाचे बील एका निलंबित मुख्याध्यापकाच्या सहीने तर माध्यमिकचे बील वरिष्ठ शिक्षकाच्या सहीने पास केले, मात्र जाणीवपूर्वक आपले वेतन रोखले, असा आरोप राजपुत यांनी निवेदनात केला आहे.

इतरांचे वेतन जमा झाल्यानंतर समाज कल्याण अधिकाऱ्यांनी १५ ऑक्टोबर २०२५ रोजी केवळ उपोषणाच्या निवेदनाची दखल घेत संस्थेला कार्यवाही करण्याचे पत्र पाठवून वेळकाढूपणा केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

दिवाळी सुट्ट्यांमुळे प्रशासनाचे दुर्लक्ष

शुक्रवारपासून (दि. १७) उपोषण सुरू झाले असतानाच, शनिवार, रविवार आणि सोमवार (दि. २०) रोजी दिवाळीनिमित्त सलग सुट्ट्या आल्या आहेत. याच सुट्ट्यांमुळे प्रशासनाचे उपोषणकर्त्या महिलेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसत आहे. ऐन सणासुदीत एका महिलेला न्यायासाठी उपोषणाला बसावे लागणे आणि सुट्ट्यांमुळे प्रशासनाने त्याकडे पाठ फिरवणे, याबद्दल संताप व्यक्त होत आहे.

जोपर्यंत ऑगस्ट २०२३ पासूनचे संपूर्ण थकीत वेतन मिळत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार श्रीमती. राजपुत यांनी व्यक्त केला आहे. या निवेदनाच्या प्रती त्यांनी पालकमंत्री, खासदार, आमदार, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि समाज कल्याण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाठवल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सर्वेक्षणानंतर वर्षभरानंतर, मेट्रो स्थानकांजवळील सार्वजनिक पार्किंगच्या जागेच्या विकासाला अद्याप गती मिळालेली नाही | पुणे...

वनाझ मेट्रो स्थानकाजवळ फूटपाथवर पार्किंग केलेल्या दुचाकी पुणे : पुणे महानगरपालिका (PMC) आणि महा मेट्रो यांनी मेट्रो स्थानकांजवळील सार्वजनिक पार्किंगसाठी ठिकाणे ओळखण्यासाठी केलेल्या...

या उन्हाळ्यात महाराष्ट्रात उष्माघाताचे २९२ रुग्ण, २१ मृत्यू

अधिका-यांनी असुरक्षित गटांना - वृद्ध, घराबाहेरील कामगार आणि जुनाट आजार असलेल्यांना - उच्च-उष्णतेचे तास टाळण्याचे, हायड्रेटेड राहण्याचे आणि लवकर वैद्यकीय सेवा घेण्याचे आवाहन...

राज्य मोठ्या प्रमाणात डिझेल वापरकर्त्यांना थेट OMCs कडून खरेदी करण्यास सांगतो, किरकोळ पंप नाही...

इंधन केंद्रांसाठी, वाहनांना प्रथम प्राधान्य दिले जाते पुणे : शुक्रवारी जारी केलेल्या राज्य सरकारच्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की मोठ्या प्रमाणात इंधनाची...

गारपीट, वाऱ्यामुळे पुणे जिल्ह्यातील १०० हेक्टरवरील फळबागा भुईसपाट पुणे बातम्या

पुण्यातील पिकांचे नुकसान झालेल्या भागाची अधिकारी पाहणी करतात पुणे : गेल्या काही दिवसांपासून जोरदार वारे, गारपीट आणि मान्सूनपूर्व पावसामुळे फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात...

कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके आज भारतात परतले आहेत. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक हातात घेऊन भारतात पाऊल ठेवलंय.   #AbhijeetDipke #cjp #LatestNews #delhi #MarathiNews

Translate »
error: Content is protected !!