अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यातील संबंध आता टोकाला पोहोचले आहेत. ग्रीनलँडमधील अमेरिकेचा प्रस्तावित गोल्डन डोम मिसाइल डिफेन्स प्रोजेक्ट आणि कॅनडाची चीनसोबतची वाढती जवळीक यावरून ट्रम्प यांनी कॅनडाला कडक शब्दांत फटकारले आहे. “जर कॅनडाने अमेरिकेच्या सुरक्षा कवच ऐवजी चीनचा हात धरला, तर चीन एका वर्षात त्यांना गिळून टाकेल,” अशा शब्दात ट्रम्प यांनी इशारा दिला आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ग्रीनलँडमध्ये गोल्डन डोम ही अत्याधुनिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली उभारण्याच्या तयारीत आहेत. ट्रम्प यांच्या मते, ही यंत्रणा केवळ अमेरिकेचेच नव्हे तर कॅनडाचेही रक्षण करेल. मात्र, कॅनडासह काही युरोपीय देशांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. याच मुद्द्यावरून ट्रम्प यांनी संताप व्यक्त करत ट्रुथ सोशलवर प्रतिक्रिया दिली. “गोल्डन डोम कॅनडाचे रक्षण करणार आहे, तरीही ते याला विरोध करत आहेत आणि चीनसोबत व्यापार करण्याला प्राधान्य देत आहेत जे पहिल्या वर्षातच त्यांना गिळंकृत करेल,” असं ट्रम्प यांनी म्हटलं.
सविस्तर वाचण्यासाठी कमेंटमधील लिंकवर क्लिक करा.
Trump cautioned Canada against favoring China over US security, citing a new trade deal. He warned that China could dominate Canada within a year, criticizing Prime Minister Carney’s ungratefulness despite US support and the rejection of the ‘Golden Dome’ missile defense system.
#LokmatNews #MarathiNews #Canada #China #Don
aldTrump
✍🏻मुख्य संपादक – VINOD MORE























