‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ या स्पर्धेच्या निमित्तानं पुणे जिल्हा आज जागतिक क्रीडा नकाशावर ठळकपणे अधोरेखित होत आहे. जगभरातील किमान ३५ देशांतून आलेले आंतरराष्ट्रीय सायकलपटू, प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि सहकारी अधिकारी यांचं यावेळी मनापासून स्वागत केलं.
ही स्पर्धा केवळ आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा नसून, पुढील अनेक पिढ्यांसाठी टिकणारा क्रीडा आणि पायाभूत विकासाचा वारसा ठरणार आहे. सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुण्याची तंत्रज्ञान, मॅन्युफॅक्चरिंग व आयटी क्षेत्रातील अग्रगण्य ओळख आणि पश्चिम घाटाचे निसर्गसौंदर्य या स्पर्धेला जागतिक स्तरावर वेगळी उंची देईल.
बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ ही स्पर्धा भविष्यात जागतिक क्रीडा कॅलेंडरमधील प्रतिष्ठेची वार्षिक स्पर्धा बनेल, असा मला पूर्ण विश्वास आहे. या माध्यमातून पुणे जिल्हा क्रीडा व पर्यटन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक ठळकपणे पुढे येईल. स्पर्धेसोबत राबवण्यात येणाऱ्या विविध पूरक उपक्रमांमुळे पर्यटकांना निसर्गसौंदर्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक किल्ल्यांचे दर्शन घेण्याचीही संधी मिळणार आहे. ही स्पर्धा पुणे व महाराष्ट्राच्या क्रीडा, पर्यटन आणि आंतरराष्ट्रीय प्रतिमेसाठी निश्चितच मैलाचा दगड ठरेल, यात विश्वास आहे.

✍🏻मुख्य संपादक – VINOD MORE























